जरांगे आरक्षणासाठी ‘सोयरे’ शब्दाकरिता आग्रही

जालना, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नोंदी आढळणाऱ्यांच्या आई, मामांकडील सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे अशी आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबर पर्यंत शासनाशी चर्चा करण्यास तयार असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. शासनाच्यावतीने मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत गुरुवारी सुमारे पाऊण तास चर्चा […]

जरांगे आरक्षणासाठी ‘सोयरे’ शब्दाकरिता आग्रही

जालना, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नोंदी आढळणाऱ्यांच्या आई, मामांकडील सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे अशी आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबर पर्यंत शासनाशी चर्चा करण्यास तयार असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

शासनाच्यावतीने मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत गुरुवारी सुमारे पाऊण तास चर्चा केली. बराच वेळ चर्चा सोयरे कोणाला म्हणावे यावरच सुरू होती. सध्या भारतात पितृसत्ताक व्यवस्था आहे. वंशावळ, आरक्षण याबाबतचे निर्णय घेताना वडिलांच्या रक्ताच्या नात्याचा विचार केला जातो. भारतातील कायद्यांमध्येच तशी तरतूद आहे. यामुळे वडिलांच्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. आईकडील नातेवाईकांना लाभ देणे शक्य नाही. संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणे आवश्यक आहे, याचीही जाणीव मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना करून दिली. यावर मनोज जरांगे पाटील यांनी ‘सोयरे नेमके कोणाला म्हणायचे’ असा प्रश्न करत आई, मामाकडील सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. अखेर तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे गिरीश महाजन म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number