जातनिहाय जनगणनेवर काय म्हणाले मुख्यमंत्री ?

नागपूर, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. या राज्याची संस्कृती इतर राज्यांपेक्षा भिन्न आहे. येथे सर्व जातीधर्माचे लोक आनंदाने सोबत राहतात, एकमेकांचे सण-उत्सव साजरे करतात. त्यामुळे राज्यात जातीय सलोखा, कायदा-सुव्यवस्था कायम राहायला हवी. या पार्श्वभूमीवर सर्व घटकांचा विचार जाणून घेत जनतेची भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री […]

जातनिहाय जनगणनेवर काय म्हणाले मुख्यमंत्री ?

नागपूर, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. या राज्याची संस्कृती इतर राज्यांपेक्षा भिन्न आहे. येथे सर्व जातीधर्माचे लोक आनंदाने सोबत राहतात, एकमेकांचे सण-उत्सव साजरे करतात. त्यामुळे राज्यात जातीय सलोखा, कायदा-सुव्यवस्था कायम राहायला हवी. या पार्श्वभूमीवर सर्व घटकांचा विचार जाणून घेत जनतेची भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातनिहाय गणनेच्या मुद्द्यावर बुधवारी रेशीमबागेतील स्मृती मंदिरस्थळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातून जातीय विषमता नष्ट करायची असेल तर जातनिहाय गणना व्हायला नको, अशी भूमिका जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेची भावना जाणून घेऊन निर्णय घेऊ, असे सांगितले. राज्यात जातनिहाय गणना होणार की नाही याबाबत स्पष्ट बोलणे मुख्यमंत्री शिंदे यांनी टाळले.

याआधी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसराला भेट दिली. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळांना पुष्पार्पण करत अभिवादन केले. नंतर संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे यांच्यासोबत त्यांची जवळपास वीस मिनिटे बंद दाराआड चर्चा केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number