ज्ञानवापीप्रकरणी मुसलमान पक्षाला झटका

ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं आज मुसलमान पक्षकारांना मोठा धक्का देत सर्व याचिका फेटाळल्या. वाराणसी कोर्टातल्या दाव्याची सुनावणी ६ महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मशिदीचं सर्वेक्षण सुरू ठेवण्यासही कोर्टानं अनुमतीही दिली आहे. सर्व्हे रिपोर्ट कोर्टात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईनं धार्मिक स्थळांच्या पूजाअर्चनेत बाधा येत नाही असा निर्वाळा हायकोर्टानं […]

ज्ञानवापीप्रकरणी मुसलमान पक्षाला झटका

ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं आज मुसलमान पक्षकारांना मोठा धक्का देत सर्व याचिका फेटाळल्या. वाराणसी कोर्टातल्या दाव्याची सुनावणी ६ महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मशिदीचं सर्वेक्षण सुरू ठेवण्यासही कोर्टानं अनुमतीही दिली आहे. सर्व्हे रिपोर्ट कोर्टात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईनं धार्मिक स्थळांच्या पूजाअर्चनेत बाधा येत नाही असा निर्वाळा हायकोर्टानं दिला. सुन्नी वक्फ बोर्ड या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. तसेच, इंतजामिया कमिटीही सर्वोच्च न्यायालयाची दारं ठोठावणार आहे.

ज्ञानवापी प्रकरणात मुसलमान पक्षाला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. न्यायालयानं त्यांच्या पाच याचिका फेटाळून लावल्या आहेत, ज्यात टायटल सूटला आव्हान देणाऱ्या मुसलमान बाजूच्या याचिकेचा समावेश आहे. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठानं हा निर्णय दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number