एनआयएचा पुण्यात छापा

पुणे, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी सॅलसबरी पार्क परिसरात छापा घातला. या पथकाने १९ वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून संशयास्पद कागदपत्रे जप्त केले आहेत. बंगळुरू येथेही एनआयएने या संबंधात कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ठाणे पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात ९ डिसेंबर रोजी छापे टाकले होते. एनआयएच्या पथकाने […]

एनआयएचा पुण्यात छापा

पुणे, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी सॅलसबरी पार्क परिसरात छापा घातला. या पथकाने १९ वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून संशयास्पद कागदपत्रे जप्त केले आहेत. बंगळुरू येथेही एनआयएने या संबंधात कारवाई केली आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ठाणे पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात ९ डिसेंबर रोजी छापे टाकले होते. एनआयएच्या पथकाने ठाणे शहरातील पडघा आणि राज्यातील वेगवेगळ्या भागात कारवाई करून दहा संशयितांना ताब्यात घेतले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार एनआयएच्या पथकाने पुण्यातील सॅलसबरी पार्क परिसरात सोमवारी कारवाई करून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून काही संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल जप्त करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number