पुणेकरांवर अघोषित पाणीकपात

पुणे, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याअंतर्गत येणार्‍या विविध जलकेंद्र आणि टाक्यांची तातडीची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी गुरुवारी (२१ डिसेंबर) रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पर्वती एमएलआर, पर्वती एचएलआर, पर्वती एलएलआर टाक्या, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवे आणि जुने होळकर जलकेंद्र, वारजे […]

पुणेकरांवर अघोषित पाणीकपात

पुणे, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याअंतर्गत येणार्‍या विविध जलकेंद्र आणि टाक्यांची तातडीची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी गुरुवारी (२१ डिसेंबर) रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पर्वती एमएलआर, पर्वती एचएलआर, पर्वती एलएलआर टाक्या, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवे आणि जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी, एसएनडीटी एमएलआर व एचएलआर परिसर, चतु:शृंगी टाकी आणि त्यावर अवलंबून परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्नराघव जोशी यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number