मालेगावकरांचे महापालिका विरोधात लोटांगण आंदोलन

मनमाड, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: ७० वर्षाच्या नागरिकाच्या नेतृत्वात सुमारे २ किलोमीटर पेक्षा जास्त लोटांगण घालत मालेगावात मनपाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महात्मा गांधी पुतळा ते मालेगाव महापालिका पर्यंत लोटांगण आंदोलन करण्यात आले असून मनपा प्रशासनाला जाग यावी यासाठी लोटांगण आंदोलन करण्यात आले. मालेगाव सार्वजनिक सुविधा समितीसह मालेगावातील विविध संघटनांनी यात सहभाग नोंदवला. […]

मालेगावकरांचे महापालिका विरोधात लोटांगण आंदोलन

मनमाड, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: ७० वर्षाच्या नागरिकाच्या नेतृत्वात सुमारे २ किलोमीटर पेक्षा जास्त लोटांगण घालत मालेगावात मनपाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महात्मा गांधी पुतळा ते मालेगाव महापालिका पर्यंत लोटांगण आंदोलन करण्यात आले असून मनपा प्रशासनाला जाग यावी यासाठी लोटांगण आंदोलन करण्यात आले.

मालेगाव सार्वजनिक सुविधा समितीसह मालेगावातील विविध संघटनांनी यात सहभाग नोंदवला. जागोजागी जलवाहिनीच्या गळतीमुळे दूषित पाणी मालेगावकरांना प्यावे लागते. त्याचबरोबर पाणीपट्टीत झालेली वाढ थांबावी आणि शहरातील वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने निर्णय घेऊन पार्किंग व्यवस्था करण्यात यावे, मालेगाव शहरतील होणारी वाहतूक कोंडी सोडवावी, यासह प्रलंबित मागण्यांसाठी लोटांगण आंदोलन करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number