बाळासाहेब सराटे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

अकोला, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण कायदा रद्द करा. ओबीसी आरक्षणाचा फेर सर्वेक्षण करून तोपर्यंत घटनाबाह्य ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणारे आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारे मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. अकोल्यात सुमारे दोन तास ही बंद द्वार चर्चा झाली […]

बाळासाहेब सराटे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

अकोला, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण कायदा रद्द करा. ओबीसी आरक्षणाचा फेर सर्वेक्षण करून तोपर्यंत घटनाबाह्य ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणारे आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारे मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. अकोल्यात सुमारे दोन तास ही बंद द्वार चर्चा झाली आहे. यावेळी बाळासाहेब सराटे यांनी प्रकाश आंबेडकरांचे आभार सुद्धा मानले. या बैठकीत एकत्र येऊन गरजवंतांचं भलं करायचं असल्यास आणि राजकीय धोरण बदलायचं असल्यास दबाव गट निर्माण करण्याचा प्रस्ताव सराटे यांनी आंबेडकरांना दिला असून, तर झालेल्या चर्चे संबधी माहिती आपण मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांना देणार असल्याचं सराटे म्हणाले. मात्र यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. प्रकाश आंबेडकर या प्रस्तावाला काय प्रतिसाद देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number