मलकापूर बँकेसमोर ठेवीदारांचे आंदोलन

संभाजीनगर, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: आदर्श बँकेच्या घोटाळ्या नंतर आता छञपती संभाजीनगर मध्ये मलकापूर बँके समोर ठेवीदारांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. शहरातील गुलमंडी शाखेच्या बँकेबाहेर हे आंदोलन सुरू असताना ‘आमच्या ठेवी आम्हाला तात्काळ परत करा अन्यथा आम्ही आत्महत्या करू’ असा कडक इशारा ठेवीदार आंदोलकांनी दिला आहे. मलकापूर बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केल्या नंतर ठेवीदारांना […]

मलकापूर बँकेसमोर ठेवीदारांचे आंदोलन

संभाजीनगर, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: आदर्श बँकेच्या घोटाळ्या नंतर आता छञपती संभाजीनगर मध्ये मलकापूर बँके समोर ठेवीदारांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. शहरातील गुलमंडी शाखेच्या बँकेबाहेर हे आंदोलन सुरू असताना ‘आमच्या ठेवी आम्हाला तात्काळ परत करा अन्यथा आम्ही आत्महत्या करू’ असा कडक इशारा ठेवीदार आंदोलकांनी दिला आहे. मलकापूर बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केल्या नंतर ठेवीदारांना प्रचंड मोठा धक्का बसला आणि त्यानंतर ठेवीदारांनी बँकेसमोर एकच गोंधळ निर्माण केला. आम्ही बँकेत गेलो की आम्हाला धमकावले जात आहे असाही धक्कादायक खुलासा यावेळी नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संचालक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावं अशी मागणी संतापलेल्या ठेवीदारांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number