नवी दिल्ली, ११ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे. ५ऑगस्ट २०१९ रोजी संसदेनं जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० रद्द केला आणि राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे दोन भाग केले आणि दोन्ही केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं.
याविरोधात सर्वोच्च न्यायालयात २३ अर्ज दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांची सुनावणी घेतल्यानंतर कोर्टानं सप्टेंबरमध्ये निर्णय राखून ठेवला होता आणि आज निर्णयाची वेळ आली आहे. म्हणजेच, ३७० रद्द केल्यानंतर ४ वर्ष, ४ महिने, ६ दिवसांनी आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. आज सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय योग्य होता की अयोग्य? हे ठरवणार आहे.