राज्यात डाळ व्यापाऱ्यांनी अब्जावधींचा महसूल बुडवला

बुलढाणा, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: गेल्या काही काळात बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात डाळ व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अब्जावधी रुपयांचा जीएसटी बुडवला आहे. या विरोधात खामगाव येथील कर सहाय्यक अधिकारी चेतनसिंग राजपूत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी केल्या, खामगाव येथील एका व्यापाऱ्याने तब्बल १ कोटी ६७ लाखांचा महसूल बुडवला म्हणून पोलिसात तक्रारही केली. मात्र या जीएसटी बुडवणाऱ्या डाळ […]

राज्यात डाळ व्यापाऱ्यांनी अब्जावधींचा महसूल बुडवला

बुलढाणा, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: गेल्या काही काळात बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात डाळ व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अब्जावधी रुपयांचा जीएसटी बुडवला आहे. या विरोधात खामगाव येथील कर सहाय्यक अधिकारी चेतनसिंग राजपूत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी केल्या, खामगाव येथील एका व्यापाऱ्याने तब्बल १ कोटी ६७ लाखांचा महसूल बुडवला म्हणून पोलिसात तक्रारही केली. मात्र या जीएसटी बुडवणाऱ्या डाळ व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे सोडून कर बुडवणाऱ्या डाळ व्यापाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकारी करत असल्याचा आरोप जीएसटी कर सहाय्यक चेतन सिंग राजपूत यांनी केला आहे. याप्रकरणी दाखल रिट याचिकेत हायकोर्टाने जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले असून जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची या प्रकरणात सादर केलेल्या दस्तऐवजांच्या आधारे उदासीनता असल्याचं हायकोर्टाने आपल्या निकालात स्पष्ट केल आहे. त्यामुळे पुढील १२ आठवड्यांच्या आत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हायकोर्टाने दिले आहेत. जीएसटी कार्यालयातूनच या डाळ व्यापाऱ्यांना कर चुकवेगिरी करण्यास अभय मिळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आल्याने जीएसटी विभागातील अधिकारी या पगार शासनाचा घेतात की या व्यापाऱ्यांचा ? हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number