मुंबई-पुणे महामार्गावर २ अपघात

लोणावळा, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी मध्यरात्री दोन अपघात झाले. या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून अकरा जण जखमी झाले. दुधाच्या टँकरने एका गाडीला जोरात धडक दिल्याने अपघात झाला त्यात टँकर चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. टँकरचालकाला स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बाहेर काढले. दुसऱ्या अपघातात खासगी बसने […]

मुंबई-पुणे महामार्गावर २ अपघात

लोणावळा, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी मध्यरात्री दोन अपघात झाले. या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून अकरा जण जखमी झाले. दुधाच्या टँकरने एका गाडीला जोरात धडक दिल्याने अपघात झाला त्यात टँकर चालकाचा जागेवरच मृत्यू झाला. टँकरचालकाला स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बाहेर काढले. दुसऱ्या अपघातात खासगी बसने अज्ञात वाहनाला धडक दिल्याने अपघात झाला. यात बस चालकाचा जागेवर मृत्यू झाला.

मुंबई ते कोल्हापूर ही बस मुंबईकडून पुण्याच्या दिशेने चालली होती. या बसने अज्ञात वाहनाला धडक दिल्याने चालकाच्या बाजूची केबिन पूर्णपणे तुटली. यात चालक गंभीर जखमी झाला. पहाटेच्या सुमारास मुंबईहून पुण्याला दिशेने निघेलेली खासगी बस बोरघाटात आल्यानंतर तिची एका अज्ञात वाहनाला धडक बसली. यात चालकाची बाजू पूर्णपणे तुटून गेल्याने चालकाला बाहेर पडणे कठीण झाले. चालक जखमी झाला. बसमधील ११ प्रवासी जखमी झाले. काही जखमींना एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number