वसई – विरार मॅरेथॉन

विरार, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अकराव्या वसई – विरार मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. वसई विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांनी संयुक्तपणे स्पर्धेचे आयोजन केले आहे. पहाटे साडेपाच वाजता पूर्ण मॅरेथॉनने स्पर्धा सुरू झाली. स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी अॅथलीट आणि अनेक आशियाई खेळांची पदक विजेती पारुल चौधरी इव्हेंट अॅम्बेसिडर म्हणून […]

वसई – विरार मॅरेथॉन

विरार, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अकराव्या वसई – विरार मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. वसई विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांनी संयुक्तपणे स्पर्धेचे आयोजन केले आहे. पहाटे साडेपाच वाजता पूर्ण मॅरेथॉनने स्पर्धा सुरू झाली. स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी अॅथलीट आणि अनेक आशियाई खेळांची पदक विजेती पारुल चौधरी इव्हेंट अॅम्बेसिडर म्हणून उपस्थित आहे तर आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश आणि आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील तसेच पालघर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी कैलास शिंदे हे अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. आमदार क्षितिज ठाकूर तसेच पालिका आयुक्त अनिलकुमार पवार, सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर, पोलिस विभागाचे आणि रेल्वेचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number