भारताचा हॉकीत दणदणीत विजय

क्वाललंपूर, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पुरुष ज्युनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताने कॅनडाविरुद्धचा सामना १० – १ असा जिंकला. या विजयासह भारताने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. स्पर्धेत क गटातून खेळत असलेल्या भारताने कॅनडाचा दारूण पराभव केला. भारतासाठी आदित्य अर्जुन लालगेने आठव्या आणि ४३ व्या मिनिटाला, रोहितने बाराव्या आणि ५५ व्या मिनिटाला, अमनदीप लाकडाने […]

भारताचा हॉकीत दणदणीत विजय

क्वाललंपूर, ९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पुरुष ज्युनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताने कॅनडाविरुद्धचा सामना १० – १ असा जिंकला. या विजयासह भारताने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. स्पर्धेत क गटातून खेळत असलेल्या भारताने कॅनडाचा दारूण पराभव केला. भारतासाठी आदित्य अर्जुन लालगेने आठव्या आणि ४३ व्या मिनिटाला, रोहितने बाराव्या आणि ५५ व्या मिनिटाला, अमनदीप लाकडाने २३ व्या आणि ५२ व्या मिनिटाला, विष्णूकांतने ४२ व्या मिनिटाला, राजिंदरने ४२ व्या मिनिटाला, कुशवाह सौरभ आनंदने ५१ व्या मिनिटाला, उत्तम सिंहने ५८ व्या मिनिटाला गोल केला. कॅनडाकडून जूड निकोलसनने २० व्या मिनिटाला गोल केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number