तीन लाखापेक्षा अधिक कुणबी नोंदी

जळगाव, ०७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा समाजास मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जळगावच्या प्रशासनाने आतापर्यंत ८२ लाख १६ हजार २५८ नोंदी तपासल्या आहेत. त्यात कुणबी जातीच्या नोंदी आढळलेल्या दाखल्यांची संख्या ३ लाख ९ हजार ७८७ इतकी आहे. ही संख्या विभागात सर्वाधिक ठरली असताना पाचही जिल्ह्यात तब्बल सव्वा तीन कोटी नोंदी तपासण्यात प्रशासनाला […]

तीन लाखापेक्षा अधिक कुणबी नोंदी

जळगाव, ०७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठा समाजास मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जळगावच्या प्रशासनाने आतापर्यंत ८२ लाख १६ हजार २५८ नोंदी तपासल्या आहेत. त्यात कुणबी जातीच्या नोंदी आढळलेल्या दाखल्यांची संख्या ३ लाख ९ हजार ७८७ इतकी आहे. ही संख्या विभागात सर्वाधिक ठरली असताना पाचही जिल्ह्यात तब्बल सव्वा तीन कोटी नोंदी तपासण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीसमोर नोंदींची माहिती सादर करण्यासाठी राज्यभरात कुणबी संवर्गाच्या दाखल्यांची तपासणी सुरु असून यात जळगावच्या प्रशासनाने कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यात आघाडी घेतली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number