मंत्री अब्दुल सत्तारांकडून नुकसानीची पहाणी

छत्रपती संभाजीनगर, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरात मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पहाणी केली. जिल्ह्यातील सिल्लोड – सोयगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात पीके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. पुरेसा पाऊस न झाल्याने शेतीचा खरिप हंगाम तर गेलाच पण […]

मंत्री अब्दुल सत्तारांकडून नुकसानीची पहाणी

छत्रपती संभाजीनगर, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरात मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पहाणी केली. जिल्ह्यातील सिल्लोड – सोयगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात पीके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. पुरेसा पाऊस न झाल्याने शेतीचा खरिप हंगाम तर गेलाच पण आता अवकाळीमुळे रब्बी हंगामावरही वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची अब्दुल सत्तार यांनी केली. नुकसानीचे पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीचा अहवार तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number