प्रक्षाळपूजेने गेला विठ्ठलाचा शीण

पंढरपूर, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : कार्तिकी वारी झाल्यानंतर शुक्रवारी १ डिसेंबर रोजी विठ्ठलाची प्रक्षाळपूजा करण्यात आली. कार्तिकी वारीत भाविकांना अहोरात्र दर्शन देणाऱ्या विठ्ठलाचा थकवा घालवण्यासाठी प्रक्षाळपूजा करण्याची परंपरा आहे. गरम पाणी, पंचामृताचा अभिषेक करण्यात आला. विठ्ठलाच्या पायाला लिंबू साखर लावून विठोबाची प्रक्षाळपूजा संपन्न झाली. यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेले विठ्ठलाचे सर्व राजोपचार पूर्ववत […]

प्रक्षाळपूजेने गेला विठ्ठलाचा शीण

पंढरपूर, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : कार्तिकी वारी झाल्यानंतर शुक्रवारी १ डिसेंबर रोजी विठ्ठलाची प्रक्षाळपूजा करण्यात आली. कार्तिकी वारीत भाविकांना अहोरात्र दर्शन देणाऱ्या विठ्ठलाचा थकवा घालवण्यासाठी प्रक्षाळपूजा करण्याची परंपरा आहे. गरम पाणी, पंचामृताचा अभिषेक करण्यात आला. विठ्ठलाच्या पायाला लिंबू साखर लावून विठोबाची प्रक्षाळपूजा संपन्न झाली. यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेले विठ्ठलाचे सर्व राजोपचार पूर्ववत करण्यात आले आहेत. विठ्ठलाचा पलंग पुन्हा शेजघरात उभा करण्यात आला आहे. प्रक्षाळपूजेनंतर विठ्ठलास सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले. या अलंकरांनी विठुरायाचे रूप खुलले होते. प्रक्षाळपूजेसाठी विठ्ठल मंदिरातही फुलांची सुंदर आरास करण्यात आली होती.

कार्तिकी यात्रेनिमित्त विठोबाचे दर्शन २४ तास सुरू ठेवण्यात आले होते. मात्र शुक्रवारपासून २४ तास दर्शन बंद करण्यात आले आहे. शनिवारपासून सकाळी सहा वाजता विठ्ठलाचे मंदिर दर्शनासाठी उघडले जाईल, तर रात्री ११ पर्यंत दर्शन सुरू राहील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number