हिंगोली, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून वादळी वार्यासह गारपीट सुरू आहे. यामुळे फळ उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा,दांडेगाव,गिरगाव ,परिसरात मोठ्या प्रमाणत केळीची लागवड केली जाते,यंदा केळीला खूप चांगला भाव असून केळी सुद्धा मोठ्या प्रमाणात लागल्या होत्या, पण वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने केळी, पपई,ज्वारी, तुर,पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, लाखो रुपये खर्चून उभारलेला केळीचा फड जमीनदोस्त झाल्याने शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला आहे,यामुळे शेतकरी आता शासनाच्या मदतीकडे आस लावून बसले आहेत.