भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये ४० प्रवाशांना विषबाधा

पुणे, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : चेन्नईहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाली असल्याची माहिती मिळाली असून या प्रवाशांच्या औषधोपचारासाठी पुणे रेल्वे स्थानकावर तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ससून रुग्णालयात प्रवाशांच्या उपचारासाठी व्यवस्था करण्याच्या सुचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. जवळपास ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याचे कळवण्यात आले आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास […]

भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये ४० प्रवाशांना विषबाधा

पुणे, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : चेन्नईहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाली असल्याची माहिती मिळाली असून या प्रवाशांच्या औषधोपचारासाठी पुणे रेल्वे स्थानकावर तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ससून रुग्णालयात प्रवाशांच्या उपचारासाठी व्यवस्था करण्याच्या सुचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. जवळपास ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याचे कळवण्यात आले आहे.

मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही रेल्वे पुणे स्थानकात आली. त्यावेळी प्रकृती खराब असल्याची तक्रार करणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर पुणे रेल्वे स्थानकातच प्रथमोपचार करण्यात आले. थोड्या वेळाने त्यांना ससून रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले. ससून रुग्णालयात रुग्णांसाठी ४० बेडची सोय करण्यात आली होती. प्रवाशांना अन्नातून झालेल्या या विषबाधेमुळे पुन्हा एकदा रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्त्वाचे मुद्दे –

भारत गौरव यात्रा रेल्वेतील प्रवाशांना विषबाधा
पुण्यातील ससूनमध्ये ४० प्रवाशांवर उपचार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number