कोल्हापूर, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शरद पवार यांनी मराठ्यांच्या जमिनी लाटून गुजराती मारवाडी यांना दिल्या, असा आरोप मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी केला. शरद पवार यांचे निकटवर्तीय कांतीलाल चोरडिया यांच्यावर कोल्हापुरातील साठ कोटींची जमीन हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कांतीलाल चोरडिया यांच्यावर कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरडिया यांच्या मालकीच्या पंचशील हॉटेलला लागून असलेली चीचणीकर सरकार यांची जमीन आहे. या जमिनीचे निलंबित दस्त जिवंत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरडिया यांनी जमीन लाटली, तर या प्रकरणी शरद पवार यांनी त्यांना मदत केल्याचा आरोपही दिलीप पाटील आणि जितेंद्र जाधव चिंचणीकर सरकार यांनी केला आहे. या प्रकरणी कांतीलाल चोरडिया, सब रजिस्टर एस बी पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ईडी कडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.