माजी क्रिकेटपटूवर फसवणुकीचा आरोप

कन्नुर, २४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : माजी क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकार एस. श्रीसंत याच्याविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कलम ४२० अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटकमधील कोल्लुर येथे क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी पैसे घेतले आणि फसवणूक केली असा आरोप त्याच्यावर आहे. एस. श्रीसंत, राजीव कुमार आणि वेंकटेश किणी यांनी क्रिकेट अकादमीसाठी १८.७० […]

माजी क्रिकेटपटूवर फसवणुकीचा आरोप

कन्नुर, २४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : माजी क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकार एस. श्रीसंत याच्याविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कलम ४२० अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटकमधील कोल्लुर येथे क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी पैसे घेतले आणि फसवणूक केली असा आरोप त्याच्यावर आहे.

एस. श्रीसंत, राजीव कुमार आणि वेंकटेश किणी यांनी क्रिकेट अकादमीसाठी १८.७० लाख रुपये घेतले. पण क्रिकेट अकादमी सुरू केली नाही. या प्रकरणात सरीश गोपालन यांनी तक्रार केली. या तक्रारीआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वादग्रस्त एस. श्रीसंत

एस. श्रीसंत २७ कसोटी, ५३ एकदिवसीय आणि १० वीस – वीस षटकांचे सामने खेळला. तो आयपीएल पण खेळला होता. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोप झाल्यामुळे एस. श्रीसंत अडचणीत सापडला. यानंतर त्याची क्रिकेटमधील कारकिर्द संपली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number