छत्रपती संभाजीनगर, २४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य शासन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार आहे, अशी ग्वाही राज्य शासनाकडून देण्यात आली आहे, असेही सूत्रांनी सांगितले. याआधी मराठा आंदोलन सुरू असल्यामुळे जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याची प्रक्रिया लांबणीवर टाकल्याचा दावा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी […]
छत्रपती संभाजीनगर, २४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य शासन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार आहे, अशी ग्वाही राज्य शासनाकडून देण्यात आली आहे, असेही सूत्रांनी सांगितले. याआधी मराठा आंदोलन सुरू असल्यामुळे जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याची प्रक्रिया लांबणीवर टाकल्याचा दावा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. पण अशोक चव्हाण यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे प्रशासनाने सांगितले.