पंढरपूर, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी वारकऱ्यांसोबत भजन केले. काही काळ फडणवीस हरीनामात दंग झाले होते. त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगड्या घातल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नीसह गुरुवारी कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाची महापूजा करणार आहेत. या महापूजेसाठी पंढरपूरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. याआधी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी महापूजा करू नये अशी भूमिका घेतली होती. पण उपमुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्यांनी प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर विरोध मागे घेतला. यानंतर उपमुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दाखल झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध मागे घेणाऱ्यांचे आभार मानले.