मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मंगळवारी पुन्हा मेगाब्लॉक

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी २ तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या बाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (एमएसआरडीसी) माहिती दिली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ३५/५०० किमी अंतरावर हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई कडून पुण्याकडे येणारी वाहतूक ही १२ […]

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मंगळवारी पुन्हा मेगाब्लॉक

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी २ तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या बाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (एमएसआरडीसी) माहिती दिली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ३५/५०० किमी अंतरावर हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई कडून पुण्याकडे येणारी वाहतूक ही १२ ते २ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे.

ही वाहने शेडुंग फाटा येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट येथे पुन्हा मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर मार्गस्थ केली जाणार आहे. या मार्गावर गँट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी २ नंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही पुन्हा सुरळीत केली जाणार आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनं ये-जा करत असतात. परंतु मंगळवारी १ तास या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप होणार आहे. या मार्गावर अपघात आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. तब्बल ३४० कोटींचा हा प्रकल्प आहे. सध्या याची कामे या मार्गावर सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number