पोलीसच निघाला घरफोडीचा आरोपी

चंद्रपूर, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: शहरातील दोन घरफोड्यांमध्ये अटकेत असलेला स्थानिक गुन्हे शाखेचा शिपाई नरेश डाहुले याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शनिवारीच निलंबनाचे आदेश जारी केले. या घटनेने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पोलिस शिपाई असलेला नरेश डाहुले याला शेअर ट्रेडिंगचा नाद लागला होता. या नादात तो पूर्णत: बुडाला. अनेक पैसे त्याने […]

पोलीसच निघाला घरफोडीचा आरोपी

चंद्रपूर, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: शहरातील दोन घरफोड्यांमध्ये अटकेत असलेला स्थानिक गुन्हे शाखेचा शिपाई नरेश डाहुले याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शनिवारीच निलंबनाचे आदेश जारी केले. या घटनेने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पोलिस शिपाई असलेला नरेश डाहुले याला शेअर ट्रेडिंगचा नाद लागला होता. या नादात तो पूर्णत: बुडाला. अनेक पैसे त्याने यात गमावले. परिरणामी त्याच्यावर जवळपास २२ लाखांचे कर्ज झाले होते. हे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न त्याला नेहमीच सतावत होता आणि यातूनच त्याने चोरीचा मार्ग अवलंबला.

घराशेजारी असलेल्या मुस्तफा रमझान शेख यांच्या घरी कुणी नसताना त्याने प्रवेश करून चोरी केली. तसेच यापूर्वीसुद्धा घराशेजारी राहणाऱ्या संगीता ठाकरे यांच्या घरीसुद्धा चोरी केली होती.

या घटनेचा पोलिस विभाग तपास करीत असतानाच नरेश डाहुले याचे कारनामे पोलिसांनी कळले. ही बाब उघड होताच रामनगर पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी त्याला लगेच निलंबित केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number