विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय संघासाठी शाहरुखची पोस्ट

मुंबई , २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. यानंतर भारतीय संघाचे डोळे पाणावले होते. यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. रविवारी हा विश्वचषक सामना पाहण्यासाठी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानही उपस्थित होता. शाहरुख सहकुटूंब सामना पाहायला आला होता. भारताचा पराभव झाल्यावर […]

विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय संघासाठी शाहरुखची पोस्ट

मुंबई , २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. यानंतर भारतीय संघाचे डोळे पाणावले होते. यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. रविवारी हा विश्वचषक सामना पाहण्यासाठी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानही उपस्थित होता. शाहरुख सहकुटूंब सामना पाहायला आला होता. भारताचा पराभव झाल्यावर शाहरुख खाननेही ट्विट करत भारतीय संघाला पाठिंबा दिला.

शाहरुखचं भारतीय क्रिकेट संघासाठी खास ट्विट केलं आहे. यात त्याने लिहिले की , “भारतीय संघाने ही संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे खेळली ती सन्मानाची बाब आहे आणि त्यांनी खूप उत्साह आणि चिकाटी दाखवली. हा एक खेळ आहे आणि नेहमीच एक किंवा दोन दिवस वाईट असतात. दुर्दैवाने आज ते घडले….परंतु क्रिकेटमधील आमच्या खेळाचा वारसा तुम्ही असाच पुढे चालू ठेवला त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो…तुम्ही संपूर्ण भारताला खूप आनंद दिला. प्रेम आणि आदर. भारताला तुमचा अभिमान आहे.” शाहरुखच्या त्या कृतीने नेटकरी किंग खानवर खुश झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number