विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कांगारुंची गाठ भारताशी

कोलकाता, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : उपांत्य फेरीचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात झाला. या चुरशीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलिया समोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियानं हे लक्ष्य पार केले आणि सामना तीन गडी राखून जिंकला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाची गाठ रविवारी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताशी आहे. रविवारी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे नरेंद्र […]

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कांगारुंची गाठ भारताशी

कोलकाता, १७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : उपांत्य फेरीचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात झाला. या चुरशीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलिया समोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियानं हे लक्ष्य पार केले आणि सामना तीन गडी राखून जिंकला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाची गाठ रविवारी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताशी आहे. रविवारी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामना सुरू होणार आहे.

दक्षिण आफ्रिका ४९.४ षटकांत सर्वबाद २१२ धावा
ऑस्ट्रेलिया ४७.२ षटकांत सात बाद २१५ धावा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number