मालेगाव, १६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाचे उपनेते आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अद्वय हिरे यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी अद्वय हिरे यांना भोपाळमधून ताब्यात घेतले आणि मालेगावच्या न्यायालयापुढे हजर केले. चौकशीसाठी अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
अद्वय हिरे यांच्यावर रेणुका सूतगिरणी संस्थेच्या नावाने जिल्हा बँकेतून ७.४६ कोटी कर्ज घेऊन त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने हिरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.त्यानंतर हिरे फरार झाले होते. पोलिसांनी अद्वय हिरे यांना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून ताब्यात घेतले आणि मालेगावच्या न्यायालयापुढे हजर केले.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि उद्धव गटाचे अद्वय हिरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. आधी हिरे यांच्या शैक्षणिक संस्थेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आता जिल्हा बँक प्रकरणात अद्वय हिरे यांना अटक झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
‘राजकीय दबावतंत्राने अद्वय हिरेंना अटक’
‘दादा भुसेंचं षडयंत्र’
संजय राऊतांचे आरोप
‘हिरेंच्या नावानं थयथयाट सुरू’
नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार