गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर व्हेलने प्राण सोडला

रत्नागिरी, १६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या व्हेलचा अखेर मृत्यू झाला. या माशाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण गुरुवारी सकाळी मासा समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला. वनविभाग स्थानिकांच्या मदतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार आहे. खोल समुद्रात आढणारा व्हेल जखमी झाला आणि वाहत गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर आला. बाल्यावस्थेत असलेल्या आणि जखमी झालेल्या या व्हेलला […]

गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर व्हेलने प्राण सोडला

रत्नागिरी, १६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या व्हेलचा अखेर मृत्यू झाला. या माशाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण गुरुवारी सकाळी मासा समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला. वनविभाग स्थानिकांच्या मदतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार आहे. खोल समुद्रात आढणारा व्हेल जखमी झाला आणि वाहत गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर आला. बाल्यावस्थेत असलेल्या आणि जखमी झालेल्या या व्हेलला उथळ पाण्यातून पुन्हा खोल पाण्यात पोहत जाणे जमत नव्हते. अखेर वनविभागाने स्थानिकांच्या मदतीने मंगळवारी रात्री उशिरा व्हेलला खोल पाण्यात नेऊन सोडले. पण हा मासा बुधवारी संध्याकाळी पुन्हा गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने येताना दिसला. किनाऱ्यावर येऊन त्याने प्राण सोडला.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झाला अथवा संवेदना बोथट झाल्या तर काही वेळा मोठा मासा समुद्रकिनारी येतो. दूषित पाणी त्याच्या डोळ्यांना लागल्यास त्याच्या दृष्टीवर परिणाम होतो तसेच समुद्रातील कीटकांमुळे या माशाला संसर्ग होऊ शकतो. अशक्त झालेला असा हा मासा किनाऱ्यावर आला तर वाचण्याची शक्यता धूसर असते. दुर्दैवाने गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या व्हेलच्या बाबतही असेच घडले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number