सहारा समुहाच्या सुब्रत रॉय यांचे निधन

मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रत रॉय यांचे मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव बुधवार १५ नोव्हेंबर रोजी लखनऊ येथे नेण्यात येईल. तिथे त्यांचे अंत्यदर्शन […]

सहारा समुहाच्या सुब्रत रॉय यांचे निधन

मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रत रॉय यांचे मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव बुधवार १५ नोव्हेंबर रोजी लखनऊ येथे नेण्यात येईल. तिथे त्यांचे अंत्यदर्शन घेण्याची व्यवस्था केली जाईल. सुब्रत रॉय यांच्या निधनाचे वृत्त कळताच समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला.

सुब्रत रॉय यांचा जन्म १० जून १९४८ रोजी बिहारमधील अररिया येथील बंगाली हिंदू कुटुंबात झाला. सुधीर चंद्र रॉय आणि छबी रॉय त्यांचे आईवडील. सुब्रत रॉय यांचे शालेय शिक्षण कोलकाता येथील होली चाइल्ड इन्स्टिट्यूटमध्ये झाले. नंतर त्यांनी गोरखपूरच्या शासकीय तंत्रनिकेत संस्थेतून यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. शिक्षण झाल्यावर सुब्रत रॉय यांनी गोरखपूरमधून व्यवसाय सुरू केला. लवकरच त्यांनी बलाढ्य सहारा समुहाची पायाभरणी केली. सुब्रत रॉय यांच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या सहारा समुहाने वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र, मनोरंजन, बांधकाम व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, विमान व्यवसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय विस्तार केला. पण पुढे चिटफंड घोटाळ्यात सुब्रत रॉय अडचणीत सापडले. काही काळ त्यांना तुरुंगात जावे लागले. मागील अनेक महिन्यांपासून ते जामिनावर होते. याच काळात वेगवेगळ्या आजारांमुळे गुंतागुंत वाढली आणि त्यांची तब्येत खालावली. दोन दिवसांपूर्वी सुब्रत रॉय यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number