ऊस दरासाठी आंदोलन

सांगली, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मागच्यावर्षी तुटलेल्या उसाला ४०० रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा, चालू उसाला ३५०० रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांसोबत आता भाजपचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांनी आष्टा – इस्लामपूर मार्गावर बावची फाट्याजवळ राजारामबाप्पू, हुतात्मा आणि दत्त इंडियाकडे ऊस घेऊन जाणारे सुमारे १०० ट्रॅक्टर अडवून रस्त्यावरच ठिय्या मारला. […]

ऊस दरासाठी आंदोलन

सांगली, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मागच्यावर्षी तुटलेल्या उसाला ४०० रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा, चालू उसाला ३५०० रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांसोबत आता भाजपचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांनी आष्टा – इस्लामपूर मार्गावर बावची फाट्याजवळ राजारामबाप्पू, हुतात्मा आणि दत्त इंडियाकडे ऊस घेऊन जाणारे सुमारे १०० ट्रॅक्टर अडवून रस्त्यावरच ठिय्या मारला.

राजारामबापू कारखाना युनिट क्रमांक तीन आणि सांगलीच्या दत्त इंडिया कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक आंदोलकांनी रोखून धरली. मिरजवाडी गावाजवळ १०० ट्रॅक्टर अडवून आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. आंदोलकांनी आष्टा, मर्दवाडी, बावची, पोखर्णी, नागाव, बागणी, काकाचीवाडी, रोझावाडी या परिसरात फिरून ऊसतोडणी बंद पाडली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number