त्र्यंबकेश्वर, १४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे महापूजा करण्यात आली. अनेक वर्षापासून पाडव्याच्या दिवशी त्रंबकेश्वर मंदिरात महापूजा करण्याची परंपरा आहे. या परंपरेचे पालन करण्यात आले. विश्व कल्याणासाठी महापूजा करण्यात आली. त्रंबकेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त स्वप्निल शेलार यांनी ही महापूजा केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी दिवाळी निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात फुलांची सजावट, दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढण्यात आली आहे.
जाणून घ्या त्र्यंबकेश्वरचे महत्त्व
त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो.गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झाला. संत निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे.