अयोध्या, ११ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : श्रीराम जन्मस्थानी शनिवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत अयोध्या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली. शरयू घाटावर बावीस लाख तेवीस हजार तेलाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने दिवे प्रज्वलित करून नव्या विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली. याआधी २०२२ मध्ये […]
अयोध्या, ११ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : श्रीराम जन्मस्थानी शनिवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत अयोध्या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली. शरयू घाटावर बावीस लाख तेवीस हजार तेलाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने दिवे प्रज्वलित करून नव्या विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली. याआधी २०२२ मध्ये अयोध्येत पंधरा लाख ७६ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले.