नगर, ९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण ९ सदस्यांनी शास्त्रींच्या हस्ते हिंदू धर्माची दीक्षा घेतली. जमीर शेख कुटुंबाने हिंदू धर्मात प्रवेश केला आहे.धर्मांतरानंतर त्यांचे नाव शिवराम अर्य झाले असून त्यांच्या पत्नी चे नाव सीता आर्य तर मुलगा बलराम आणि कृष्ण असे नाव धारण करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या तीन दिवसीय कार्यक्रमाची बुधवारी छत्रपती संभाजी नगर येथे सांगता झाली. याच कार्यक्रमात काही मुस्लीम कुटुंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण ९ सदस्यांनी शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे.
‘केंद्र सरकार, बागेश्वर धाममध्ये श्रेष्ठत्वाची लढाई’ – विजय वडेट्टीवार