मनोज जरांगे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर

राज्यभरात मनोज जरांगे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी माध्यमांशी बोलताना यासंबधीची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठी भेटी घेण्यासाठी ते पुन्हा दौरा सुरू करीत आहे. १५ नोव्हेंबर पासून ते २३ नोव्हेंबर दौरे करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. मनोज जरांगेंचा दौरा स्वरूप १५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा १६ नोव्हेंबर रोजी दौंड, […]

मनोज जरांगे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर

राज्यभरात मनोज जरांगे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी माध्यमांशी बोलताना यासंबधीची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठी भेटी घेण्यासाठी ते पुन्हा दौरा सुरू करीत आहे. १५ नोव्हेंबर पासून ते २३ नोव्हेंबर दौरे करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.

मनोज जरांगेंचा दौरा स्वरूप

१५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा

१६ नोव्हेंबर रोजी दौंड, मायणी

१७ नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड

१८ नोव्हेंबर रोजी सातारा, मेंढा, वाई, रायगड

१९ नोव्हेंबर रोजी रायगड, राडगड दर्शन, रायगड ते पाचाड दर्शन, मुळशी आंळदी

२० नोव्हेंबर रोजी तुळापुर, पुणे, खराडी, चंदननगर, आंळदी, खालापुर, कल्याण

२१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक त्र्यबंकेश्वर,

२२ नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संमगमनेर, श्रीरामपुर

२३ नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई त्यानंतर आंतरवली.

चौथ्या टप्प्यामध्ये आपण राहिलेला मराठवाडा, विदर्भ, कोकण असे ६ टप्प्यात आपण दौरे करणार असल्याची माहिती यावेळी जरांगे यांनी दिली आहे. कोल्हापूर येथून शाहू महाराजांच्या स्मारकापासून या दौऱ्यांची सुरुवात करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे.

मनोज जरांगे हे १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या दरम्यान राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहेत. एकूण ६ टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे हे कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number