मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस जाहीर

मुंबई, ०८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: दिवाळीच्या तोंडावर पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला नसल्याने आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाचे कान टोचले होते. त्यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी २६ हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. तर आरोग्य सेविकांनाही एक महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. दिवाळी बोनस संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर पालिका प्रशासकांनी हा […]

मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस जाहीर

मुंबई, ०८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: दिवाळीच्या तोंडावर पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला नसल्याने आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाचे कान टोचले होते. त्यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी २६ हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. तर आरोग्य सेविकांनाही एक महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. दिवाळी बोनस संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर पालिका प्रशासकांनी हा निर्णय घेतला आहे.

मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना २२५०० रुपये बोनस देण्यात आला होता. यावर्षी किमान ३० हजार रुपये बोनस मिळावा यासाठी कर्मचारी संघटनांनी पालिका प्रशासनाकडे मागणी केली होती. अलीकडेच कर्मचारी संघटनांची पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली. त्यामुळे यंदा महापालिका कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number