अमरावती, ८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : संपूर्ण राज्यात आरोग्य कंत्राटी कर्मचारी समायोजन करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करतात..अमरावतीत आजचा आंदोलनाचा १४ वा दिवस आहे.. अमरावती देखील आरोग्य कंत्राटी आणि कर्मचारी आंदोलनाला बसले आहे. यावेळी त्यांनी आज आंदोलन स्थळी अंगावर लाल वस्त्र परिधान करून सरकारचा निषेध केला आहे.
कंत्राटी पदावर असलेल्या शासकीय सेवेत समायोजन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री केवळ तोंडी आश्वासन देतात.. त्यांनी कंत्राटी कामगारांचा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. सोबतच शासकीय सेवेत समायोजन करून घेण्यात यावे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिलाय.