नवी मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नवी मुंबईतील सीवूड येथे मनपातर्फे उभारण्यात आलेले पाळणाघर तीन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. हे पाळणाघर सुरु करण्यासाठी मनसेतर्फे शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘जो बाळा जो जो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक पाळणा हलवत अंगाई देखील गाण्यात आली. पाळणाघर लवकरात लवकर सुरू न केल्यास मनसे स्टाईलने हे पाळणाघर सुरू […]
नवी मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : नवी मुंबईतील सीवूड येथे मनपातर्फे उभारण्यात आलेले पाळणाघर तीन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. हे पाळणाघर सुरु करण्यासाठी मनसेतर्फे शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘जो बाळा जो जो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक पाळणा हलवत अंगाई देखील गाण्यात आली. पाळणाघर लवकरात लवकर सुरू न केल्यास मनसे स्टाईलने हे पाळणाघर सुरू करण्यात येईल असा इशारा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.