कोटा, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बिग बॉस ओटीटी फेम यूट्युबर एल्विश यादव याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. एल्विशला राजस्थानमध्ये शनिवारी पोलिसांनी कोटा येथे चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर काही तासांतच एल्विशची सुटका झाली.
काय आहे हे प्रकरण ?
बिग बॉस ओटीटी फेम यूट्युबर एल्विश यादव याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत तो सापासोबत दिसला. यानंतर काही प्राणीप्रेमींनी एल्विश आणि त्याच्या मित्रमंडळींवर रेव्ह पार्टीत व्यसनासाठी मर्यादीत विष घेतल्याचा आणि त्यासाठीच सापाचा वापर केल्याचा आरोप केला. एल्विशने पार्टीचे आयोजन केले असाही आरोप करण्यात आला. या प्रकरणात यूट्युबर एल्विश यादव आणि इतर पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी पाच जणांना अटक केली. एल्विशचा शोध सुरू होता. अखेर एल्विशला राजस्थानमध्ये शनिवारी पोलिसांनी कोटा येथे चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर काही तासांतच एल्विशची सुटका झाली.
महत्त्वाचे मुद्दे
एल्विश आणि पाच गारुडी अशा सहा जणांविरोधात गुन्हा
पाच गारुड्यांना अटक
राजस्थानमधील कोटा येथे एल्विशला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले
चौकशीनंतर काही तासांतच एल्विशची सुटका
व्हायरल झालेला व्हिडीओ काही महिन्यांपूर्वीचा – एल्विश
एल्विश समाजमाध्यमांमध्ये प्रचंड लोकप्रिय