पुणे पालिकेतील कंत्राटी कामगारांची दिवाळी गोड होणार

पुणे, ०४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची यंदाची दिवाळी गोड होणार असून, त्यांना बोनस देण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त नि. अ. वाळके यांनी काढले असून, यासंदर्भात महापालिकेला पत्र पाठविण्यात आले आहे. दरम्यान, हा बोनस महापालिका देणार नसली तरी महापालिकेच्या ठेकेदारांना बोनस प्रदान अधिनियम १९६५ लागू असल्याने त्यांच्याकडून ही रक्कम वितरित होणे आवश्‍यक […]

पुणे पालिकेतील कंत्राटी कामगारांची दिवाळी गोड होणार

पुणे, ०४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची यंदाची दिवाळी गोड होणार असून, त्यांना बोनस देण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त नि. अ. वाळके यांनी काढले असून, यासंदर्भात महापालिकेला पत्र पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, हा बोनस महापालिका देणार नसली तरी महापालिकेच्या ठेकेदारांना बोनस प्रदान अधिनियम १९६५ लागू असल्याने त्यांच्याकडून ही रक्कम वितरित होणे आवश्‍यक आहे. या आदेशामुळे महापालिकेतील ९ हजार कामगारांना न्याय मिळाला आहे.

महापालिकेत सुमारे ९ हजार कंत्राटी कामगार असून, कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही बोनस, सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी बुधवारपासून (ता. १) महापालिकेपुढे उपोषण सुरु केलेले होते. कंत्राटी कर्मचारी आणि कायम कर्मचारी समान काम करत असल्याने कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही बोनस मिळावा अशी मागणी लावून धरली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number