हिरे कुटुंबावर गुन्हा दाखल

नाशिक, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: नाशिक, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: माजी मंत्री पुष्पा हिरे,अद्वय हिरे आणि अपूर्व हिरे यांच्यासह १०६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमबाह्य भरती केल्या प्रकरणी हिरे परिवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा संस्था संचालित माध्यमिक शाळांमध्ये तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकारी व मुख्याध्यापक यांनी […]

हिरे कुटुंबावर गुन्हा दाखल

नाशिक, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: नाशिक, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: माजी मंत्री पुष्पा हिरे,अद्वय हिरे आणि अपूर्व हिरे यांच्यासह १०६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमबाह्य भरती केल्या प्रकरणी हिरे परिवारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा संस्था संचालित माध्यमिक शाळांमध्ये तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकारी व मुख्याध्यापक यांनी एका संस्थेत २२ शिक्षक, १२ शिपाई आणि ६ लिपिक तसेच दुसऱ्या एका संस्थेच्या माध्यमातून ७ शिक्षक आणि १ लिपिक पदाची भरती करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे संचालक असलेले हिरे कुटुंबीय, संचालक मंडळासह मुख्याध्यापक आणि भरती केलेल्या कर्मचाऱ्यांवर नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी माहिती दिली आहे. कलम ४२०,४०६,४६७,४६८ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number