पंढरपूर, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा समाजातील ज्या नागरिकांच्या आधीच्या पिढीतल्यांचे कुणबी असल्याचे दाखले मिळत आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. ही प्रक्रिया सुरू असताना पंढरपूर येथे एका शाळेत जुने मराठी आणि मोडी लिपीतील कुणबी दाखले सापडले आहेत. एका प्राध्यापकाने हे दाखले शोधून काढले आहेत. या दाखल्यांची पडताळणी करून कायद्याच्या चौकटीत राहून अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
पंढरपुरात सापडले मराठी आणि मोडी लिपीतील कुणबी दाखले
शाळेत सापडल्या कुणबी जातीच्या नोंदी
प्राध्यापकाने शोधल्या कुणबी आणि मराठा जातीच्या नोंदी
मनोज जरांगे पाटील यांची मागणी
सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.