सांगली, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सांगलीमध्ये चार आणि पाच नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. नाट्य परिषदेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. मराठा आंदोलन सुरू असल्यामुळे राज्यभरातून या मुहूर्तमेढीसाठी कलाकार तसेच मान्यवर सांगलीत येणार आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने मुहूर्तमेढीचा हा नियोजित कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. याबाबत मध्यवर्ती कार्यालयाला कळविण्यात आले असून मराठा आंदोलन शांत झाल्यानंतर पुढील तारीख जाहीर केली जाईल असं सांगली कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.