सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाच्या विषयाने चांगलाच पेट घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी सर्वत्र हिंसाचारदेखील पाहायला मिळत आहे. याच्याच पार्श्वभूमीवर ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीने जबाबदार भूमिका घेतली आहे.
सर्वत्र सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी छेडलेल्या आंदोलनाला सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. अनेक ठिकाणी आंदोलने पुकारली जात आहेत. मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. आत्महत्यादेखील वाढताना दिसत आहेत. तसेच, सर्वच माध्यमांवरून या हिंसाचाराची दृश्य दाखवली जात असताना ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीने जबाबदार भूमिका घेतली आहे.
‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीची भूमिका
आम्ही हिंसाचाराचे समर्थन करत नाही. आम्ही हिंसाचाराची दृश्य दाखवणार नाही. अशी भूमिका ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीने घेतली आहे.
“आम्ही ‘जय महाराष्ट्र’ मराठी वृत्तवाहिनीवर आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसाचाराची दृश्य दाखवणार नाही. ज्यांना महाराष्ट्रात तेढ हवीय त्यांनी हिसाचाराचे खुशाल समर्थन करावे.” – प्रसाद काथे, संपादक