गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन्ही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत तोडफोड करण्यात आली. मुंबईत क्रिस्टल टॉवर परिसरात ही घटना घडली. ‘तोडफोडीच्या घटनेवर सदावर्ते यांची प्रतिक्रिया आली आहे. मला कुणीही शांत करू शकत नाही, तोडफोड हीच शांततामय आंदोलनाची […]

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन्ही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत तोडफोड करण्यात आली. मुंबईत क्रिस्टल टॉवर परिसरात ही घटना घडली.

‘तोडफोडीच्या घटनेवर सदावर्ते यांची प्रतिक्रिया आली आहे. मला कुणीही शांत करू शकत नाही, तोडफोड हीच शांततामय आंदोलनाची व्याख्या आहे काय ? असा प्रश्न सदावर्ते यांनी उपस्थित केला. माझ्या मुलीला, पत्नीला जीवे मारण्याची धमकी आली आहे, असेही सदावर्ते म्हणाले. हल्ला झाला तरी माझा लढा थांबणार नाही, असे सदावर्ते यांनी सांगितले. तोडफोड आणि धमकी प्रकरणात जरांगे यांना अटक करा अशी मागणी सदावर्ते यांनी केली.

ठरवून गाड्या फोडल्या’

गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन्ही गाड्या ठरवून फोडण्यात आल्या. हा एक सुनियोजीत कट होता. कारण गाड्या फोडण्यात आल्या त्यावेळी तिथे कॅमेरे होते; असे भाजपाचे निलेश राणे म्हणाले. उद्धव गटाचा गाड्या फोडण्याच्या कटात हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number