ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईत अटक

चेन्नई, १८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतले. पोलिसांनी ललितला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ललित पाटीलला सोमवार २३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ललित अठरा दिवसांपूर्वी फरार झाला होता. पुणे पोलिसांची […]

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईत अटक

चेन्नई, १८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतले. पोलिसांनी ललितला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ललित पाटीलला सोमवार २३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ललित अठरा दिवसांपूर्वी फरार झाला होता. पुणे पोलिसांची दहा पथके तसेच मुंबई आणि नाशिक पोलीस ललित पाटीलला शोधत होती.

अंमली पदार्थ प्रकरणात तुरुंगात असताना ललित पाटील अनेकदा तब्येत बरी नसल्याचे कारण पुढे करू लागला. तुरुंगातील डॉक्टरचे प्रमाणपत्र मिळवून वारंवार तो ससूनमध्ये उपचारांसाठी दाखल होऊ लागला. ससूनमधून तो अंमली पदार्थांचा व्यवसाय बिनबोभाट चालवत होता. तो काही दिवसांपूर्वी ससूनमधूनच फरार झाला. पोलीस त्याला शोधत होते. पोलिसांनी नाशिकमध्ये ललित पाटीलच्या कारखान्यावर धाड टाकून अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला होता. या प्रकरणात पोलिसांनी ललितचा शोध सुरू ठेवला आणि त्याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना अटक केली होती. शोध सुरू असतानाच ललित चेन्नईत असल्याची माहिती मिळाली. यानंतर मुंबई पोलिसांनी चेन्नईतून ललित पाटीलला अटक केली.

अंमली पदार्थ प्रकरणी १५ जणांना अटक

अंमली पदार्थ प्रकरणी ललित पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे या तीन जणांसह एकूण १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number