पुणे, १८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पुणे पोलिसांनी कमरूल मंडल नावाच्या बांगलादेशी घुसखोराला अटक केली. चौकशी सुरू असताना हा घुसखोर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असल्याचे लक्षात आले. यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणात लक्ष घातले. पुण्यातील हडपसर पोलिसांनी चौकशीतून हाती आलेली माहिती न्यायालयाला दिली आहे.
कमरूल मंडल याने बेनापोल, बांगलादेश येथे हातबॉम्ब टाकले होते. या प्रकरणात त्याला बांगलादेश पोलिसांनी अटक केली होती. काही दिवसांनंतर कमरून जामिनावर सुटला होता. जामीन मिळाल्यानंतर कमरूलने भारतात घुसखोरी केली. त्याने बनावट कागदपत्रे सादर करून पुण्यातून भारतीय पारपत्र अर्थात पासपोर्ट मिळवला होता.
पुण्यातील बांगलादेशी नागरिकांना शोधून त्यांची कागदपत्रे तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले. या मोहिमेत पोलिसांनी कमरूल मंडल नावाच्या बांगलादेशी घुसखोराला अटक केली.