चोरट्याने लढवली अफलातून शक्कल

बुलढाणा, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यात एका चोरट्याने अफलातून शक्कल लढवत सोन्याच्या दुकानातून तहसीलदाराच्या नावाने सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याची साखळी पळवली आहे. या अफलातून प्रकारामुळे चिखली तालुक्याचे तहसीलदारही चांगलेच चक्रावले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात असलेल्या दिघेकर ज्वेलर्स मध्ये जाऊन एका चोरट्याने तहसीलदारांना सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याची साखळी विकत घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही सोन्याची […]

चोरट्याने लढवली अफलातून शक्कल

बुलढाणा, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यात एका चोरट्याने अफलातून शक्कल लढवत सोन्याच्या दुकानातून तहसीलदाराच्या नावाने सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याची साखळी पळवली आहे. या अफलातून प्रकारामुळे चिखली तालुक्याचे तहसीलदारही चांगलेच चक्रावले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात असलेल्या दिघेकर ज्वेलर्स मध्ये जाऊन एका चोरट्याने तहसीलदारांना सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याची साखळी विकत घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही सोन्याची साखळी आणि अंगठी घेऊन तहसीलदारांना भेटायला चला असं म्हणून एका चोरट्याने दीघेकर ज्वेलर्स मधून त्याच्या कर्मचाऱ्यासह चिखली तहसील कार्यालय गाठले. मात्र तहसीलदार हजर नसल्याचे सांगून या चोरट्याने ‘मी या सोन्याच्या अंगठ्या आणि साखळी तहसीलदार साहेबांना दाखवून येतो असं सांगितलं’. त्यांनतर या चोरट्याने सोन्याच्या अंगठ्या आणि सोनसाखळी घेऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घडलेला प्रकार दिघेकर ज्वेलर्सच्या मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चिखली पोलिसात तक्रार दिली आहे. चिखली पोलिसांनी अवघ्या बारा तासातच या चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number