सख्ख्या भावाचा बहिणीवर अत्याचार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरामध्ये बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणाने आपल्या सख्ख्या बहिणीवरच अत्याचार केला आहे . पीडित अल्पवयीन मुलगी दोन महिन्याची गरोदर असल्याचं वैद्यकीय तपासणीतून समोर आलं आहे. पीडित मुलीला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेलं आहे. पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी युवकाला मनमाड येथून […]

सख्ख्या भावाचा बहिणीवर अत्याचार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरामध्ये बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणाने आपल्या सख्ख्या बहिणीवरच अत्याचार केला आहे . पीडित अल्पवयीन मुलगी दोन महिन्याची गरोदर असल्याचं वैद्यकीय तपासणीतून समोर आलं आहे. पीडित मुलीला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेलं आहे. पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी युवकाला मनमाड येथून ताब्यात घेतले आहे. २० वर्षीय तरुणाने त्याच्या १५ वर्षीय मुलीवर गेल्या चार ते पाच महिन्यांत वारंवार अत्याचार केले. त्यातून पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिचे पोट दुखायला लागले असता ९ आक्टोंबर रोजी आईने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी मुलगी गरोदर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोट जास्त दुखायला लागल्याने तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी २० वर्षीय तरुणाविरोधात अत्याचाराचे कलमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number