पुणे, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : केशवनगरमधील रस्त्यांची दूरवस्था झाल्यामुळे तेथील रहिवाशांकडून पुणे महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेबाहेर केशवनगर येथील रहिवाशांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी ऑक्सिजनचे मास्क तसेच खड्ड्यांमुळे मणक्यांना त्रास होऊ नये यासाठी कंबरपट्टा लावत अनोखे आंदोलन करण्यात आले. केशवनगर येथील रहिवाशांकडून पुणे महानगरपालिका प्रत्येक कर वसूल करते, मात्र मूलभूत सेवा […]
पुणे, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : केशवनगरमधील रस्त्यांची दूरवस्था झाल्यामुळे तेथील रहिवाशांकडून पुणे महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेबाहेर केशवनगर येथील रहिवाशांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी ऑक्सिजनचे मास्क तसेच खड्ड्यांमुळे मणक्यांना त्रास होऊ नये यासाठी कंबरपट्टा लावत अनोखे आंदोलन करण्यात आले. केशवनगर येथील रहिवाशांकडून पुणे महानगरपालिका प्रत्येक कर वसूल करते, मात्र मूलभूत सेवा पुरवत नाही असा आरोप करत हा धडक मोर्चा काढण्यात आला होता.