गावकऱ्यांनी पुणे – नागपूर महामार्ग रोखून धरला

बुलढाणा, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे – नागपूर महामार्गावर टाकरखेड भागिले गावात गावकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. गेल्या दीड तासापासून गावकऱ्यांनी हा रास्ता रोको केल्याने या मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. महामार्गाचे निर्माण करत असताना अनेक नियम धाब्यावर बसून महामार्गाला लागून पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले तयार करण्यात आले नाहीत, त्याचबरोबर गावाशेजारी […]

गावकऱ्यांनी पुणे – नागपूर महामार्ग रोखून धरला

बुलढाणा, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे – नागपूर महामार्गावर टाकरखेड भागिले गावात गावकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. गेल्या दीड तासापासून गावकऱ्यांनी हा रास्ता रोको केल्याने या मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. महामार्गाचे निर्माण करत असताना अनेक नियम धाब्यावर बसून महामार्गाला लागून पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले तयार करण्यात आले नाहीत, त्याचबरोबर गावाशेजारी ब्रेकर ही टाकले नाहीत. त्यामुळे टाकरखेड भागिले या गावात अपघात वाढले आहेत. त्याचबरोबर पुणे नागपूर हा महामार्ग गावकऱ्यांच्या जीवावर उठला असल्याने गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारत हा महामार्ग रोखून धरला आहे. जोपर्यंत महामार्गावर ब्रेकर टाकण्यात येत नाही आणि नाल्याचे बांधकाम करण्यात येत नाही तोपर्यंत गावकऱ्यांनी रास्ता रोको मागे घेण्यास नकार दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number